दादरमधील शिवाजी पार्क मैदानात नियोजित दसरा मेळावा घेण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला परवानगी दणेयाचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी दिला. यानंतर ठाकरे गट समर्थकांनी मुंबईबरोबरच महाराष्ट्रात अनेक ठिकाणी जल्लोष साजरा केला. अशातच रात्री उशीरा ठाण्यामधून मुंबईच्या दिशेने रवाना होण्याआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्रकारांनी या घडामोडींसंदर्भात प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलण्यास नकार दिला.
#ShivajiPark #BJP #UddhavThackeray #BombayHighCourt #EknathShinde #MNS #NCP #HWNews